Kanda Market : कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर विराजमान आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात याची शेती पाहायला मिळते. साहजिकच शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. पण कांदा दराला सध्या ग्रहण लागल आहे.
भावात सातत्याने घसरण होत असल्याने वाहतुकीचा खर्च देखील शेतकऱ्यांना पेलेनासा झालाय. त्यामुळे सांगा आता शेती करायची कशी असा सवाल उपस्थित झाला आहे. सप्टेंबर पर्यंत अतिशय कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा ऑक्टोबर मध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होऊ लागला.
नोव्हेंबर मध्ये मात्र विक्रमी दर मिळाला, तब्बल साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच्या कमाल बाजारभावावर पोहचला. मात्र आता गेल्या एका महिन्यापासून पुन्हा एकदा दरात घसरण झाली आहे. आज तर औरंगाबाद एपीएमसी मध्ये कांद्याला मात्र सहाशे रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे.
इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अशीच परिस्थिती होती. कांदा हा एक हजार रुपये प्रतिक्विंटल ते 1500 च्या आसपास विक्री झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्त्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 7612 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1200 प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3375 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2412 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1750 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 7000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 450 रुपये एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1300 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1750 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3000 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 600 रुपये एवढा किमान दर मिळाला असून 1701 रुपये एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1500 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1361 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 800 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 6780 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 145 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1225 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 850 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज या मार्केटमध्ये 13355 क्विंटल कांद्याची आवक झाली. या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 12927 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी दर 850 रुपये एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1500 आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1352 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.