Kanda Market 2024 : केंद्रातील सरकारने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी सहा देशांना कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत घेण्यात आलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायी ठरू शकतो अशी आशा व्यक्त होत आहे.
मात्र काही लोकांनी सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याचा आरोप केला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 27 एप्रिल 2024 ला केंद्राने ९९ हजार १५० मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
तसेच त्याआधी भारत सरकारने २००० मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीला परवानगी दिली होती. एकंदरीत आता देशातून एक लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा निर्यात करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळाली आहे.
पण याचा शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदार यांना कोणताच फायदा होणार नाही असा आरोप कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या माध्यमातून केला जात आहे. अशातच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे आज राज्यातील काही बाजारांमध्ये कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा झालेली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला नेमका काय भाव मिळाला आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कुठे मिळाला विक्रमी भाव
कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लोकल कांद्याला किमान 1500, कमाल 2500 आणि सरासरी पंधराशे रुपये असा भाव मिळाला आहे.
अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट : मिळालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये लाल कांद्याला किमान एक हजार रुपये, कमाल 2200 आणि सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज लाल कांद्याला किमान 100, कमाल 2100 आणि सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटाल असा दर मिळाला आहे.
चंद्रपूर गंजवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान एक हजार, कमाल 1850 आणि सरासरी पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला किमान 400, कमाल 1990 रुपये आणि सरासरी 1451 रुपये असा भाव मिळाला आहे.