Kanda Market 2024 : महाराष्ट्रात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. अहमदनगर, सोलापूर, नाशिक, पुणे समवेतच महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कांद्याची लागवड होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक संकटात सापडले आहेत. कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव अडचणीत आले असून शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.
खरतर वीस दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीवर लागू असलेली बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2023 पासून केंद्रातील सरकारने कांदा निर्यात बंदी लागू केली होती. मात्र तेव्हापासून कांदा बाजार भावात मोठी घसरण झाली.
यामुळे कांदा निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान निवडणुकीचा काळ पाहता केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला.
आता कांदा निर्यात सुरू होऊन जवळपास 20 दिवसांचा काळ उलटला आहे मात्र तरीही कांद्याला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. दुसरीकडे कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
खरे तर सरकारने कांदा निर्यात सुरू केली मात्र निर्यातीसाठी काही अटी घालून दिल्या आहेत. त्यामुळे कांदा निर्यात सुरू झाली असली तरी देखील याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. सरकारने कांदा निर्यातीसाठी 550 प्रति टन किमान निर्यात किंमत (MEP) आणि 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे.
यामुळे मात्र कांदा निर्यात सुरू झाली असतानाही शेतकऱ्यांना फायदा होत नाहीये. जर केंद्रातील सरकार कांद्यासाठी लावण्यात आलेली किमान निर्यात किंमत आणि निर्यात शुल्क काढेल तर मात्र बाजार भावात सुधारणा होऊ शकते, असा विश्वास काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या कांद्याला काय भाव मिळतोय ?
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार या बाजारात काल कांद्याला किमान 200, कमाल 1500 रुपये आणि सरासरी 850 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात किमान 800 रुपये, कमाल 1600 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे.
राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती : अहिल्या नगर मधील राहता एपीएमसी मध्ये काल कांद्याला किमान भाव 250 रुपये, कमाल भाव 2100 रुपये आणि सरासरी भाव 1500 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कालच्या लिलावात कांद्याला किमान 100 रुपये, कमाल 2500 रुपये आणि सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.