Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला कांदा दरात चांगली वाढ झाली होती. महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील सर्वच भागात कांदा दरात मोठी वाढ झाली. यामुळे प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
अहमदनगरमध्ये देखील महिन्याच्या सुरुवातीला कांदा दरात वाढ झाली होती. मात्र आठवड्याभरापासून कांदा दरात सातत्याने घसरून पाहायला मिळत आहे. कांदा दरात होणारी घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी सरासरी बाजारभाव मिळाला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 नोव्हेंबर रोजी झालेले लिलावात लाल कांद्याची 859 क्विंटल आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला होता तर कमालदार पंचवीसशे एक रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला तसेच सरासरी बाजार भाव 1501 रुपये नमूद करण्यात आला.
काल या एपीएमसीमध्ये नंबर एक कांद्याची 1719 क्विंटल आवक झाली होती. काल झालेल्या लिलावात कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर, 1800 कमाल दर, तसेच सरासरी दर 1600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.
तसेच नंबर दोन कांद्याला 1 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून, कमाल दर 1400 तसेच सरासरी बाजार व बाराशे रुपये नमूद करण्यात आला.
याशिवाय नंबर तीन कांद्याला 500 रुपये किमान, कमाल दर 1000 आणि 750 रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.
संगमनेर व्यतिरिक्त अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांदा दरात घसरण झाली आहे. काल या एपीएमसी मध्ये 23 हजार 315 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याचे आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला नऊशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव पंधराशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी एपीएमसी मध्ये देखील कांदा दरात घसरण पाहायला मिळाली. या एपीएमसी मध्ये काल 7777 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 100 रुपये एवढा किमान, दोन हजार रुपये एवढा कमाल आणि बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात घसरण पाहायला मिळत आहे. पारनेर एपीएमसी मध्ये काल झालेल्या लिलावात कांद्याला दोनशे रुपये किमान, 1900 रुपये कमाल आणि बाराशे रुपये सरासरी दर मिळाला आहे.
निश्चितच अहमदनगर जिल्ह्यातही कांदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा वांदा करत आहे. जाणकार लोकांनी महाराष्ट्रात दिवाळीनंतर कांदा दरात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली होती. झालं देखील तसंच दिवाळीनंतर कांदा दरात वाढ झाली मात्र दक्षिणेकडील कांदा अजूनही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने आता महाराष्ट्रातील कांदा दरात घसरण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.