Kanda Bajarbhav : आज कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. खरं पाहता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा बाजारभावात मोठी वाढ होत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसात कांदा बाजार भावात 500 ते 600 रुपयांची वाढ नमूद करण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल बाजारभावात विक्री झाला होता. मात्र सोलापूर एपीएमसी मध्ये झालेली ही दरवाढ लगेच दुसऱ्या दिवशी कमी झाली. आज तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 500 रुपयांची घसरण झाली.
आज झालेल्या लिलावा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल बाजारभाव 3500 प्रतिक्विंटलचा मिळाला. मात्र असे असले तरी सध्याच्या कांदा बाजारभावाची सप्टेंबर महिन्याच्या कांदा बाजारभावाशी तुलना केली असता सध्या मिळत असलेला बाजार भाव हा निश्चितच विक्रमी आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पावसाचा लहरीपणामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
शेतकरी बांधवांच्या मते कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचे 50% एवढ नुकसान झाले आहे. तसेच परतीच्या पावसाचा तसेच अतिवृष्टीचा नवीन लाल कांदा लागवडीला देखील मोठा फटका बसला आहे. यावर्षी नवीन लाल कांदा लागवड चांगलेच खोळंबली असून नवीन लाल कांदा बाजारात येण्यासाठी जानेवारीचा महिना उजाडणार असल्याचे जाणकारांनी नमूद केले आहे.
अशा परिस्थितीत बाजारात कांद्याची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत निर्माण होणार आहे. मागणीप्रमाणे पुरवठा होणार नसल्याने कांदा बाजार भाव पुन्हा एकदा तेजीत येणार असल्याचे चित्र आहे. कांदा बाजारभावात आज थोडीशी घसरण झाली असली तरीदेखील येत्या महिन्याभरात कांद्याच्या बाजारभावात विक्रमी वाढ होणार असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे.
मित्रांनो जाणकार लोकांच्या मते येत्या महिन्याभरात कांदा चार हजार रुपये प्रति क्विंटल पार होणार आहे. निश्चितच जाणकार लोकांनी वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर शेतकरी बांधवांना सुगीचे दिवस येणार आहेत.