Kanda Bajarbhav : कांद्याला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमधील शेतकरी बांधव या पिकाची शेती करत आहेत. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मात्र मोठा सिंहाचा वाटा आहे.
राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खान्देश अशा विविध भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मात्र कांद्याची शेती सर्वात जास्त होते. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे कांद्यावर अर्थकारण अवलंबून आहे.
दरम्यान राज्यातील कांदा उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा कांद्याचे बाजार भाव वाढतील अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
या निमित्ताने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. सध्या राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याला 1200 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. हा सरासरी भाव आहे.
कमाल बाजार भाव 2500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा मिळतोय. दरम्यान किरकोळ बाजाराचा विचार केला असता देशाच्या आजादपूर बाजारात 17 ते 27 रुपये प्रति किलो या दरात कांदा विकला जात आहे.
शनिवारपासून कांद्याच्या बाजारभावात थोडी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात आणखी दर वाढतील अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत यूएई आणि बांगलादेशला 64,400 टन कांदा निर्यात करण्यास नुकतीच मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे आगामी काळात कांदा बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. या निर्णयानुसार 50 हजार टन कांदा बांगलादेशला निर्यात केला जाणार आहे.
तसेच उर्वरित म्हणजे 14,400 टन कांदा यूएईला निर्यात केला जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी केंद्र सरकारच्यावतीने वाणिज्य मंत्रालयाने अधिसूचनाही जारी केली आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आगामी काळात दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता सरकारच्या निर्णयामुळे खरंच भाव वाढ होते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.