Kanda Bajarbhav : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेची बातमी समोर आली आहे. कांदा दरात केवळ एक आठवड्यात तब्बल सहाशे रुपयांचे घसरण नमूद करण्यात आली आहे. खरं पाहता सप्टेंबर पर्यंत कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला जात होता.
मात्र ऑक्टोबरमध्ये कांदा दरात थोडी सुधारणा झाली. तर नोव्हेंबर मध्ये कांद्याला विक्रमी बाजार भाव मिळू लागला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आधार मिळत होता. मात्र आता कांदा दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनंतर कांदा बाजारभावात मोठी वाढ झाली होती अन कांद्याला गत आठवड्यापर्यंत 2800 रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजार भाव मिळत होता. किमान बाजार भाव देखील 1000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत नमूद होत होता. आता मात्र कांदा बाजारभावात क्विंटल मागे पाचशे रुपयांची घसरण झाली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की चार नोव्हेंबर रोजी एशिया खंडातील सर्वात मोठे कांदा बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान बाजार भाव 1001 रुपये प्रतिक्विंटल तर कमाल बाजार भाव 3260 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला होता. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2540 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला होता. मात्र, 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात कांदा दरात मोठी घसरण झाली.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 तारखेला कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला तर कमल बाजारभाव 2652 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 1850 रुपये नमूद करण्यात आला. अर्थातच कांदा बाजार भावात मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे 12 तारखेला कांद्याचे आवड चार नोव्हेंबर पेक्षा कमी होती. म्हणजेच आवक कमी असूनही कांदा दरात होणारे घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे.
फक्त लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच नाही तर नाशिक जिल्ह्यातील अजून एक महत्त्वाची बाजारपेठ अर्थातच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांदा दरात मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्येही ४ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला किमान १५०० रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव मिळाला तर कमाल बाजारभाव ३६५० रुपये प्रतिक्विंटल एवढा होता. तसेच सरासरी बाजारभाव २६५० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
मात्र शनिवारी पिंपळगाव एपीएमसी मध्ये देखील कांदा दरात घसरण झाली. किमान १३००, कमाल ३०२०, तर सरासरी २१०० रुपये दर मिळाला. यामुळे निश्चितच राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढत आहे.