Kanda Bajarbhav : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पिक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अहमदनगर जिल्ह्यात देखील कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता सप्टेंबर महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कांद्याच्या बाजारभावात रोजाना सुधारणा होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत.
मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता. मात्र आता कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली असून काल पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पिंपळगाव मध्ये कांद्याचा सरासरी बाजार भाव देखील मोठा उल्लेखनीय होता.
काल झालेल्या लिलावात पिंपळगाव एपीएमसी मध्ये कांद्याला 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच कांद्याच्या बाजारभावात झालेली ही सुधारणा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देणारी ठरत आहे. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कांदा बाजार भावात वाढ झाली आहे. सोलापूर एपीएमसी मध्ये काल झालेल्या लिलावात कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. मात्र, सोलापूर एपीएमसी मध्ये सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रतिक्विंटल एवढाच नमूद करण्यात आला.
दरम्यान काल अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली. काल अहमदनगर एपीएमसी मध्ये कांद्याची सर्वाधिक आवक नमूद करण्यात आली आहे. काल अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 52 हजार 434 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात काल कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 3400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
तसेच काल झालेल्या लिलावात अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते, बाजारात सध्या जुना कांदा आवक होत असून नवीन लाल कांदा आवक होण्यासाठी अजून अवकाश आहे. नवीन लाल कांद्याची आवक जानेवारी महिन्यात वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. या परिस्थितीत बाजारात जानेवारी महिन्यापर्यंत कांदा दरात केजी पाहायला मिळणार आहे.