Kanda Bajarbhav : कांदा हे राज्यात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची महाराष्ट्रातील बहुतांशी भागात लागवड केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा तसेच कोकणात देखील कांदा लागवड पाहायला मिळते. मित्रांनो खरं पाहता कांदा या नगदी पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असले तरी देखील कांदा पिकाला बेभरौशाचे पीक म्हणून संबोधत असतात.
कांदा दरात नेहमीच चढ-उतार पाहायला मिळत असल्याने या पिकाला बेभरवशाचे पीक म्हणतात. खरं पाहता सप्टेंबर महिन्यापर्यंत कांद्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत होता. मात्र तदनंतर बाजारात कांद्याची आवक कमी झाली असल्याने आणि मागणी वाढली असल्याने कांदा बाजार भाव वाढ झाली. दिवाळीच्या सुरुवातीस कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली. कांद्याला ऑक्टोबर महिन्यात चांगला बाजार भाव मिळत होता तर नोव्हेंबर महिन्यात कांदा बाजार भावात अजूनच वाढ झाली.
मित्रांनो खरं पाहता गेल्या आठवड्यात कांद्याला 4000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव मिळाला. सर्वसाधारण बाजार भाव देखील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2500 प्लस पाहायला मिळाला. मात्र, आता कांदा बाजारभावात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. बाजारात कांद्याचे आवक वाढली असल्याने कांदा बाजारभावात घसरण होत असल्याचे चित्र आहे.
खरं पाहता कांद्याच्या कमाल बाजारभावात कमी घसरण झाली असली तरी देखील सरासरी बाजार भावात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. राज्यातील काही ठराविक कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा कमी बाजार भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा कांदा पिकाने धोका दिला आहे. मित्रांनो काल झालेल्या लिलावात कल्याण पेन संगमनेर आणि मुंबई याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी बाजार भावाने 2500 रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला.
उर्वरित बाजार समितीमध्ये कांदा सरासरी बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी पाहायला मिळाले. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार परराज्यात कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात घसरण होत आहे. निश्चितच कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत होता मात्र आता पुन्हा एकदा कांदा दरात घसरण झाले असल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढली आहे.