Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कांदा दरात मोठी विक्रमी वाढ झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना याचा दिलासा मिळत होता.
खरं पाहता अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचा कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. शिवाय परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील लाल कांद्याला देखील फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने भरून निघेल अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात जागी झाली. मात्र, 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेले कांदा दर गेल्या तीन ते चार दिवसात पुन्हा एकदा कमी होऊ लागले. यामुळे कांदा पुन्हा वांदा करेल असे चित्र निर्माण झाले होते.
दरम्यान आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये आज कांदा पुन्हा कडाडला आहे. आज या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात कांदा दरात दोनशे रुपयांची उसळी पाहायला मिळाली. खरं पाहता काल झालेल्या लिलावात अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव, तीन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल बाजार भाव आणि सरासरी बाजार भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला होता.
मात्र आज झालेल्या लिलावात अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांदा दरात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. आज या एपीएमसी मध्ये कांद्याला 1200 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2200 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. म्हणजेच या एपीएमसी मध्ये आज किमान कमाल आणि सरासरी बाजारभावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.
निश्चितच अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांदा दरात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी सुखद असून येत्या काही दिवसात कांदा दरात अजूनच वाढ होईल अशी शेतकऱ्यांना आशा आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी जोवर नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत नाही तोवर कांदा दरातील तेजी टिकून राहिल असा अंदाज वर्तवला आहे.
जाणकार लोकांच्या मते जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन लाल कांदा बाजारात विक्रीसाठी येणार आहे. तोपर्यंत कांदा दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे. निश्चितच सध्या कांदा दरात आलेली तेजी कांदा उत्पादकांसाठी थोडासा दिलासा देणारी सिद्ध होत आहे.