Kanda Bajarbhav : गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात कांद्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. खरं पाहता सप्टेंबर महिन्यात कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत होता. त्यापूर्वी देखील गेली पाच महिने कांदा अतिशय नगन्य बाजार भावात शेतकऱ्यांना विक्री करावा लागला आहे. मात्र आता गेल्या महिन्याभरापासून विशेषता नोव्हेंबर मध्ये कांद्याच्या दरात रोजाना वाढ होत आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सप्टेंबर महिन्याच्या सुमारास हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत विक्री होणारा कांदा तब्बल 3500 रुपये प्रति क्विंटल ते 3600 प्रतिक्विंटल पर्यंत विक्री होऊ लागला. मात्र मध्य प्रदेशमधील कांद्याची आवक वाढली असल्याने कांदा बाजारभावात घसरण झाली असून जवळपास क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांचे घट पाहायला मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये मध्यप्रदेश राज्याचा कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल होत असल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. खरं पाहता गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर स्थिर होते. मात्र तदनंतर कांद्याची मागणी मोठी वाढली असल्याने बाजारभावात वाढ झाली असून क्विंटल मागे 500 ते 1000 रुपये एवढे दर वाढले होते. मात्र आता मध्य प्रदेश मधील कांदा राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला असल्याने कांदा दरात घट होत आहे.
जवळपास 500 ते 600 रुपयांचे क्विंटल मागे घट नमूद करण्यात आली आहे. खरं पाहता यावर्षी नवीन लाल कांदा बाजारात उशिरा दाखल होणार आहे. तसेच नवीन लाल कांदा लागवडीला पावसाचा फटका बसला आहे. परिणामी बाजारात उशिरा कांदा दाखल होईल तसेच उत्पादनात देखील घट होणार आहे. सध्या बाजारात जास्त करून जुना कांदा विक्रीसाठी येत आहे. विशेष म्हणजे जुन्या कांद्याची प्रत देखील साठवणुकीत राहिल्यामुळे खराब झाली आहे.
शिवाय जुना कांदा वजनात देखील कमी झाला आहे. तसेच कांदा चाळीत साठवला असल्याने कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. शेतकऱ्यांच्या मते, कांदा दरात वाढ झालेली असली तरी देखील त्यांनी जर कांदा चाळीत तीन ट्रॅक्टर कांदा साठवला असेल तर त्यांना केवळ दिड ट्रॅक्टर कांदा आता मिळत आहे.
म्हणजे जवळपास 50 टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत वाढीव दराचा त्यांना फायदा मिळत नाही मात्र वाढीव दरामुळे त्यांचे नुकसान भरून निघत आहे. दरम्यान आता कांदा बाजारभावात मध्यप्रदेशच्या कांद्यामुळे घट होत आहे. यामुळे पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी संकटाच्या भवऱ्यात सापडणार आहे.