Kanda Bajarbhav : सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या बाजार भावात मोठी घसरण होत होती. सप्टेंबर पर्यंत कांदा अतिशय कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विकावा लागला आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून कांदा बाजारभावात रोजाना थोडी थोडी वाढ पाहायला मिळाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीपासून कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळायला सुरवात झाली. मात्र आता कांदा बाजार भावात पुन्हा एकदा घसरण सुरु झाली आहे.
आज झालेल्या लिलावात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1,250 रुपये प्रतिक्विंटल ते 2,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजारभाव मिळाला आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची माहिती जाणून घेणार आहोत.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- खेड चाकण एपीएमसी मध्ये आज 390 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसी मध्ये आज 21 हजार 974 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 3700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव १४०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :- धुळे एपीएमसीमध्ये आज तीन हजार पन्नास क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1,250 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- जळगाव एपीएमसी मध्ये आज 583 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला 527 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजारभाव १४०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज १८०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2250 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 11407 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला ₹800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1700 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसी मध्ये आज 1000 क्विंटल एवढी पांढऱ्या कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2250 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याची पंधराशे क्विंटल आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला अडीचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2551 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1650 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– लासलगाव एपीएमसी मध्ये आज 8160 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2890 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.