Kanda Bajarbhav : मित्रांनो यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे पार कंबरडे मोडले आहे. जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जास्तीच्या पावसाचा फटका कांदा पिकाला देखील बसला आहे. जास्तीच्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील कांदा चाळीत साठवलेला कांदा खराब झाला आहे.
याशिवाय जास्तीच्या पावसामुळे खरीप हंगामातील कांदा रोपवाटिका उध्वस्त झाले आहेत. जास्तीच्या पावसामुळे कांदा लागवड लांबले असून अनेक ठिकाणी शेतकरी बांधवांना कांदा लागवड करता आली नाही. परिणामी शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. शिवाय गेल्या पाच ते सहा महिन्यापासून शेतकरी बांधव अतिशय कवडीमोल दरात कांदा विक्री करत आहेत.
दरम्यान आता ऑक्टोबर महिन्यापासून बाजारातील चित्र बदल असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. सप्टेंबर महिन्यात अतिशय कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगलाच कडाडला आहे. यामुळे आता कांदा पिकाचे झालेले नुकसान वाढीव दरातून भरून निघणार असल्याची आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मित्रांनो आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आता कांदा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला 3260 रुपये प्रति क्विंटर एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून 1011 प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे.
तसेच कांद्याला सरासरी 2550 रुपये प्रति क्विंटल चा बाजार भाव मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्याने सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. मात्र असे असले तरी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने पिकासाठी झालेला खर्च अद्याप वसूल झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव
सप्टेंबर महिन्यापर्यंत कांद्याला अतिशय कवडीमोल दरू मिळत होता यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसत होते. दरम्यान आता नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगला दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कांदा दरात झालेली वाढ येथील शेतकरी बांधवांना उभारी मिळवून देत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण यावेळी पाहायला मिळत आहे.
कांदा दरात वाढ झाली पण तरीही शेतकरी बांधव अजूनही नुकसानीत
मित्रांनो सप्टेंबर महिन्याशी तुलना केली असता सध्या मिळत असलेला कांदा बाजार भाव समाधानकारक असून यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मित्रांनो खरं पाहता यावर्षी जास्तीच्या पावसामुळे हंगामातील लाल कांदा लागवड बराच काळ रखडली होती, शिवाय लाल कांदा रोपवाटिका देखील उध्वस्त झाल्या होत्या.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे बराकीत साठवून ठेवलेला कांदा देखील मोठ्या प्रमाणात खराब झाला. अनेक ठिकाणी जास्तीच्या पावसामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा वाहून गेला. यामुळे शेतकरी बांधवांना वाढीव दराचा दिलासा मिळत असला तरी देखील शेतकऱ्यांना या दरवाढीचा किती फायदा मिळतो ही एक निश्चितच विश्लेषणात्मक बाब राहणार आहे.