Kanda Bajarbhav : आज कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज लाल कांद्याला पुन्हा एकदा विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.
मात्र उन्हाळी कांदा पुन्हा ही कवडीमोल दारात विक्री होत आहे. आज पेन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल 3400 प्रतिक्विंटलचा कमाल दर मिळाला असून किमान तर आणि सरासरी दर 3200 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा विचार केला असता लाल कांद्याला 1300 रुपये प्रति क्विंटल ते 3200 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच लाल कांदा बाजार भावात सुधारणा होत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लाल कांदा लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसी मध्ये आज 17627 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. हाच झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 628 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर कांद्याला मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2000 रुपये नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसी मध्ये आज 28 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये नवीन लाल कांद्याला 2601 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर 2602 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 2602 नमूद झाला आहे
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसीमध्ये आज 1940 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2100 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 788 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1350 रुपये नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 554 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1650 रुपये नमूद करण्यात आला आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये मात्र आज लाल कांदाही दबावात पाहायला मिळाला. आज इंदापूर एपीएमसी मध्ये 121 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1525 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल तर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 900 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पेन कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये लाल कांद्याची 282 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3400 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 3200 रुपये नमूद करण्यात आला आहे.
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये दहा क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, कमाल आणि सरासरी बाजारभाव मिळाला.