Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा दरात मोठी तेजी आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात थोडीशी घसरण थोडी घसरण सुरु होती.
मात्र आज पुन्हा एकदा कांदा दरात वाढ झाली असून कांदा पुन्हा एकदा तेजीत आला आहे. खरं पाहता काल सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला होता. मात्र आज सोलापूर एपीएमसी मध्ये कमाल दरात मोठी वाढ झाली आहे.
आज या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4657 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1700 रुपये प्रति नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :– या एपीएमसी मध्ये आज 11276 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावा की एपीएमसी मध्ये कांद्याला 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2150 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसी मध्ये आज 19920 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 3200 प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1550 रुपये प्रति क्विंटल राहिला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसी मध्ये आज 1520 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1500 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4495 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1790 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 12000 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1650 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– येवला एपीएमसी मध्ये आज 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2299 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसी मध्ये आज 6375 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2464 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1850 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 19750 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2680 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1750 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- उमराणे एपीएमसी मध्ये आज 11500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून १९०० रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये नमूद करण्यात आला आहे.