Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याचे चित्र आहे. खरं पाहता यावर्षी प्रमुख कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये खरीप हंगामातील कांदा पिकाचे जवळपास 40 टक्के एवढे नुकसान नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कांद्याची उपलब्धता कमी राहणार आहे.
अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले असल्याने तसेच जून महिन्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचे आगमन झाले नसल्याने खरीप हंगामात कांदा लागवड कमी झाली आहे. परिणामी कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे.
अशा परिस्थितीत बाजारात कांद्याचा मोठा शॉर्टेज निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याने कांदा बाजारभावात वाढ होणार आहे. मित्रांनो एका मीडिया रिपोर्टनुसार यावर्षी खरीप हंगामात कर्नाटक मध्ये 14 टक्के महाराष्ट्रात 11 टक्के आणि आंध्र प्रदेश मध्ये 19 टक्के एवढी कांदा लागवड कमी झाली आहे.
यामुळे येत्या काही दिवसात बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होणार असून कांदा दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, नवीन लाल कांदा अजूनही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत नसल्याचे चित्र आहे. नवीन लाल कांदा बाजारात जानेवारी महिन्याच्या सुमारास दाखल होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे असलेला जुना उन्हाळी कांदा कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
परिणामी सध्या बाजारात कांद्याची आवक घटली आहे. यामुळे कांदा दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान कांद्याच्या भावात येत्या महिन्याभरात मोठी वाढ होणार आहे. कांदा दरात किती वाढ होणार हे सांगणे थोडे मुश्किल आहे. मात्र काही जाणकार लोकांनी कांद्याला 70 ते 80 रुपये प्रति किलो पर्यंत बाजारभाव मिळू शकतो असे नमूद केले आहे.
निश्चितच हा एक फक्त अंदाज आहे. मात्र कांद्याची उपलब्धता पाहता जाणकार लोकांचा हा अंदाज खरा ठरणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान शेतकरी बांधवांच्या मते कांदा बाजारभावात वाढ झाली असली तरी देखील कांद्याचे उत्पादनात मोठी घट झाली आहे यामुळे कांदा दरवाढीचा त्यांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे.