Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली अन कांदा दरात भली मोठी वाढ पाहायला मिळाली. यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.
दरम्यान जाणकार लोकांनी कांदा दरात झालेली वाढ जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र जाणकार लोकांचा हा अंदाज फोल ठरला असून कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याच्या कमाल बाजारभावाने 3500 चा पल्ला गाठला होता, सरासरी बाजार भाव देखील 2500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळत होता आणि शेतकऱ्यांना पूर्वी जो कांदा कवडीमोल दारात विकला होता त्याची भरपाई वाढीव दरातून मिळणार होती.
मात्र आता पुन्हा एकदा कांदा दरात घसरण झाली असून शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. दरम्यान आता कांदा दर वाढतील का याकडे सर्वांचे लक्ष आहे. जाणकार लोक देखील कांदा दरातील चढउतारीमुळे कांदा दरात वाढ होईल की नाही याबाबत साशँक असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज १०५३४ क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज सात क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1500 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 424 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढ्या किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1250 रुपये नमूद करण्यात आला आहे.