Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेपासून कांदा दरात मोठी वाढ होत आहे. खरं पाहता सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा अतिशय कवडीमोल दरात शेतकऱ्यांनी विकला आहे. मात्र आता कांदा दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दरम्यान यावर्षी जास्तीच्या पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी कांदा चाळीस साठवलेला कांदा देखील जास्तीच्या पावसामुळे खराब झाला आहे.
एवढेच नाही तर हंगामातील लाल कांदा लागवडीला देखील पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. मात्र आता कांदा दरात वाढ होत असल्याने शेतकरी बांधवांच्या कांदा पिकाचे जे नुकसान झाले होते ते वाढीव दराने भरून निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाचे विस्तृत पण थोडक्यात चर्चा करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज 6290 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव १७०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 16654 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2550 रुपये प्रति क्विंटल ठेवला नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– सोलापूर एपीएमसी मध्ये आज 17975 क्विंटल एवढी लाल कांद्याचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 1450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 2000 क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2,400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याची 8265 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2750 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 2385 क्विंटल एवढी लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव १७५० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :– पुणे एपीएमसी मध्ये आज 9964 क्विंटल एवढी लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– येवला एपीएमसी मध्ये आज 6500 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 3000 रुपये प्रति गुंटूर एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2100 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज कांद्याची 2500 क्विंटल एवढी आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव १७०० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नासिक कृषी उत्पन्न बाजार समिती :– नासिक एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याची 2920 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2750 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसी मध्ये 1850 रुपये नमूद करण्यात आला.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– लासलगाव एपीएमसी मध्ये आज 15000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार 53 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2360 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 12,670 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2852 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2300 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :– मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बारा हजार क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव 2455 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवण एपीएमसीमध्ये आज 18000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2350 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सटाणा एपीएमसी मध्ये आज 14,410 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2980 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2050 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- पिंपळगाव एपीएमसीमध्ये आज 22,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 3300 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2351 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 15500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 701 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9860 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2785 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव १७०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.