Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (Onion Rate) रोजना वाढ होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Onion Grower Farmer) दिलासा मिळत आहे. खरं पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव (Onion Market Price) मिळत होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) उत्पादन खर्च काढता येणे देखील अशक्य बनले होते.
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. दरम्यान केंद्र शासनाने एक निर्णय घेतला असून यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना फटका बसणार आहे. खर पाहता किरकोळ बाजारात कांद्याला 40 रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव मिळत असून येत्या काही दिवसात पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळण्याची आशा जाणकार लोकांकडून व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाने (Government) कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता बफर स्टॉक मधला कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे. एवढेच नाही तर आता केंद्र शासनाने 54 हजार टन कांदा राज्यांना पाठवला आहे. यामुळे सहाजिकच खुल्या बाजारात कांद्याची आवक वाढणार असून कांदा बाजार भाव नियंत्रणात राहणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहे. मात्र अजून तरी याचा परिणाम घाऊक बाजारात दिसत नसल्याचे चित्र आहे. आज देखील राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला समाधानकारक बाजार भाव मिळाला आहे.
अजून कांद्याच्या बाजारभावात घसरण झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसात याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावात पाहायला मिळणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले असून यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे कांदा बाजार भाव सविस्तर.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
22/10/2022 | ||||||
कोल्हापूर | — | क्विंटल | 5843 | 700 | 2500 | 1600 |
औरंगाबाद | — | क्विंटल | 952 | 400 | 1600 | 1000 |
जुन्नर – नारायणगाव | चिंचवड | क्विंटल | 32 | 300 | 2150 | 1500 |
कराड | हालवा | क्विंटल | 201 | 200 | 2000 | 2000 |
सोलापूर | लाल | क्विंटल | 21251 | 100 | 3150 | 1400 |
पंढरपूर | लाल | क्विंटल | 759 | 200 | 2400 | 1100 |
नागपूर | लाल | क्विंटल | 300 | 1400 | 2300 | 2075 |
भुसावळ | लाल | क्विंटल | 4 | 1500 | 1500 | 1500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 340 | 1500 | 3500 | 2500 |
पुणे- खडकी | लोकल | क्विंटल | 34 | 1000 | 1500 | 1250 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 22 | 1000 | 1400 | 1200 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 204 | 700 | 1800 | 1250 |
नागपूर | पांढरा | क्विंटल | 260 | 1400 | 2300 | 2075 |
लासलगाव – विंचूर | उन्हाळी | क्विंटल | 9540 | 650 | 2400 | 1800 |
पिंपळगाव बसवंत | उन्हाळी | क्विंटल | 8626 | 400 | 2655 | 1900 |