Kanda Bajarbhav : साधारणता एक ते दीड महिन्यापूर्वी टोमॅटो दरात विक्रमी उसळी आली होती. टोमॅटोचे बाजारभाव किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले होते. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिक बाजारभाव टोमॅटोला मिळाला होता. याचा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला.
अशातच, आता गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे देखील बाजारभाव तेजीत आले आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे बाजारभाव 80 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले आहे. घाऊक बाजारातही कांद्याचे दर तेजीत आले आहेत.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजार भाव 5,000 प्लस झाले आहेत. काही ठिकाणी सहा हजाराचा देखील टप्पा गाठला आहे. सरासरी बाजार भाव देखील साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. काही ठिकाणी याहीपेक्षा अधिकचा भाव कांद्याला मिळत आहे.
यामुळे गेली कित्येक महिने कवडीमोल दरात कांदा विक्री केल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना कांद्याचा खरा मोल मिळू लागला आहे. सोण्यासारख्या शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
अशातच मात्र आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा मार्केटमधून अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधून शेतकऱ्यांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली. ती म्हणजे फक्त दोन दिवसातच लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याच्या बाजारभावात 725 रुपयांपर्यंतची घसरण नमूद करण्यात आली आहे.
काल अर्थातच एक नोव्हेंबर 2023 रोजी लासलगाव एपीएमसी मध्ये कांद्याला सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. 27 ऑक्टोबरला मात्र या एपीएमसी मध्ये कांद्याला सरासरी 4925 रुपये प्रति क्विंटल एवढा दर नमूद करण्यात आला होता. म्हणजेच फक्त दोन दिवसाच्या काळातच सरासरी बाजार भाव आता तब्बल 725 रुपयांची घसरण झाली आहे.
कांदा बाजार भावात घसरण होण्याचे कारण?
येत्या काही दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात दिवाळीचा सण सेलिब्रेट होणार आहे. दिवाळीच्या सणाला लासलगाव एपीएमसी बंद राहणार अशा आशयाचे मेसेज देखील सोशल मीडियामध्ये सध्या वेगाने वायरल होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करू लागले आहेत. सणासुदीला पैशांची निकड भासणार असल्याने सध्या कांद्याची आवक वाढली आहे.
याशिवाय दोन दिवसांपूर्वी केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यात मूल्ये 400 डॉलर प्रति टन वरून वाढवून 800 डॉलर प्रति टन एवढे केले आहे. याचा परिणाम असा झाला की, निर्यात मंदावली आहे.निर्यात कमी झाली असल्याने देशांतर्गत कांद्याचा मुबलक साठा उपलब्ध झाला आहे.
म्हणजे गरजेपेक्षा अधिक कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय केंद्र शासनाने बफर स्टॉक मधील कांदा किरकोळ बाजारात विक्रीसाठी काढला असून 25 रुपये प्रति किलो या दराने या मालाची शासनाकडून विक्री केली जात आहे. शासनाकडून जवळपास दोन लाख मॅट्रिक टन बफर स्टॊकमधील कांदा किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलोने विकला जाणार आहे.
हे तीन महत्त्वाचे कारण आहेत ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. काल लासलगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी २०००, सरसरी ४२०० जास्तीत जास्त ४८९९ प्रतिक्विंटल असा भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसी मध्ये लाल कांद्याला कमीत कमी १६००, सरसरी ३२०० जास्तीत जास्त ४२०० एवढा भाव मिळाला आहे.