Kanda Bajarbhav : सप्टेंबर महिन्यात कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत होता. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून कांदा दरात मोठी वाढ झाली आहे. आता कांद्याला चांगला समाधानकारक बाजार भाव मिळू लागला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान आज गेल्या पाच महिन्याच्या तुलनेत कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे.
आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज कांद्याचे 8516 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसी मध्ये आज कांद्याला सर्वोच्च कमाल बाजारभाव मिळाला आहे. आज झालेल्या लिलावात सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याची 29,428 क्विंटल आवक झाली. कालच्या तुलनेत सोलापूर एपीएमसी मध्ये आज कांद्याचे आवक वाढली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज कांद्याची 5771 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3300 प्रतिकूल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2050 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2921 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2100 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज कांद्याची 9 हजार 16 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार चार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2400 रुपये प्रतिकून ठरला मुत करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज नऊ हजार सात क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3300 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची कांदा बाजारपेठ अर्थातच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची 6680 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2550 रुपये प्रति क्विंटर नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याची 12 हजार 350 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3385 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2550 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.