Kanda Bajarbhav : यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठा आव्हानात्मक राहिला आहे. अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे यावर्षी खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता तर परतीच्या पावसामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला आहे.
यामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक कांदा पिकाला देखील मोठा फटका बसला आहे. तसेच कांदा चाळीस हटवलेला कांदा देखील परतीच्या पावसामुळे वाहून गेला आहे तर काही ठिकाणी जास्तीच्या पावसामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा खराब झाला आहे.
एकीकडे जास्तीच्या पावसामुळे उत्पादनात घट होत आहे तर दुसरीकडे कमी पावसामुळे देखील कांदा उत्पादनात घट राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातही काहीशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यात बहुतांशी शेतकरी कांदा पिकाची लागवड करत असतात. मात्र नंदुरबार जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाळी काळात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी बहुतांशी ठिकाणी कांदा लागवड अपेक्षित अशी पाहायला मिळत नाही.
जिल्ह्यात कांदा लागवड खूपच कमी प्रमाणात झाली असल्याने कांदा उत्पादनात घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्पादनात घट म्हणजेच कांदा दरात वाढ होणार आहे. यामुळे वाढीव दराचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी निघणार आहे. वाढीव दरामुळे शेतकरी बांधवांचे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होईल तर सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र कांदा उत्पादनात घट झाली असून आता येत्या काही दिवसात कांदा दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
नंदुरबार तालुका हा कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. तालुक्यात खरीप हंगामातील लाल कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने कांदा उत्पादनात घट होणार असून कांदा दरात वाढ होणार आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे दर वाढणार असून किरकोळ बाजारात देखील कांदा कडाडणार आहे. एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यात कांदा दरात वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. राज्यातील इतरही भागात कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
तसेच आता कांदा चाळीत साठवलेला जुना कांदा देखील संपत चालला आहे. शिवाय जुना कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याने शेतकऱ्यांना याचा देखील फटका बसला आहे. एकीकडे नवीन लाल कांदा उत्पादनात घट तर दुसरीकडे जुना कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला असल्याने शेतकरी बांधवांची दुहेरी पिळवणूक झाली आहे.
मात्र येत्या काही दिवसात कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात असल्याने शेतकऱ्यांना कुठे ना कुठे दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते कांदा दरात वाढ झाली तरी देखील त्यांना फारसा फायदा होणार नाही मात्र झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होणार आहे.