Kanda Bajarbhav : अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता सप्टेंबर महिन्यापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा अतिशय कवडीमोल दरात विकला आहे. मात्र आता कुठेतरी परिस्थिती बदलू लागली असून शेतकरी बांधवांच्या कांद्याला चांगला दर मिळू लागला आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. आज अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1600 रुपये प्रति क्विंटल ते 2070 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव हा शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नाही मात्र दरात सुधारणा झाली असल्याने भविष्यात कांदा दरात अजूनच वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात जानेवारी महिन्यापर्यंत कांदा दर तेजीत राहणार आहेत.
शेतकरी बांधवांजवळ असलेला जुना कांदा आता संपुष्टात येत असतानाच नवीन कांदा देखील बाजारात उशिरा दाखल होणार असल्याने बाजारात कांद्याचा शॉर्टेज निर्माण होऊन कांदा दरात अशीच वाढ जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1640 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2070 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 5495 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2800 रुपये प्रति गुंटूर एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.