Kanda Bajarbhav Maharashtra : यंदा कांदा दरातील लहरीपणा हा कांदा उत्पादकांसाठी मोठा घातक ठरला आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोल दरात कांदा विकला. त्यानंतर बाजारभावात वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात कांदा 2500 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री होऊ लागला.
नोव्हेंबर महिन्यात मात्र हंगामातील उच्चांकी दर मिळाला. कांद्याला 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजार भाव नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाहायला मिळाला. मात्र, गेल्या महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यापासून कांदा दरात जी घसरण झाली ती आजतागायत कायम आहे.
सध्या कांदा साडेसातशे रुपये प्रति क्विंटल ते साडे पंधराशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. दरम्यान आज जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2250 रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर मिळाला आहे.
मात्र या एपीएमसी मध्ये सरासरी दर 1555 एवढाच नमूद करण्यात आला. एकंदरीत सरासरी बाजार भाव अजूनही दोन हजार रुपये प्रति क्विंटल च्या खालीच आहेत. भविष्यात यामध्ये भाव वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अजूनही आशा आहे.
मात्र तूर्तास कांदा दर दबावात आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 5595 क्विंटल चिंचवड कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1550 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 305 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1250 रुपये प्रतिक्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 13687 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या मार्केटमध्ये कांद्याला 400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 8523 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 1150 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 317 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी तर 750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.