Kanda Bajarbhav Maharashtra : कांदा बाजाराचा लहरीपणा या चालू वर्षात विशेष पाहायला मिळाला आहे. या चालू वर्षी फेब्रुवारी ते जून या कालावधीत कांद्याला खूपच कवडीमोल भाव मिळाला आहे. जुलै महिन्यात मात्र परिस्थिती थोडी बदलली होती. जुलैमध्ये कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली होती.
जुलै महिन्यात राज्यातील अनेक बाजारात कांद्याला 2000 पासून ते 2500 रुपये तर ते क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला होता. परंतु कांदा बाजारात खरी तेजी आली ती ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कांद्याला तब्बल 3000 रुपये प्रति क्विंटल ते 3500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता.
सरासरी बाजार भाव देखील 2500 ते 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. काही बाजारात मात्र सरासरी दर यापेक्षा कमी होते परंतु राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारात कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत होता. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात म्हणजेच या चालू महिन्यात कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी वर्तवली होती.
काही तज्ञांनी सप्टेंबर महिन्यात किरकोळ बाजारात कांद्याला तब्बल 55 ते 60 रुपये प्रति किलो असा भाव मिळेल असा दावा केला होता. यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक तुगलकी निर्णय घेतला. केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यासाठी 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे कांद्याचा बाजारभाव मात्र कमी होतांना पाहायला मिळत आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर कांदा दरात थोडे दिवस घसरण झाली. मात्र आता पुन्हा एकदा कांदा दर हळूहळू वाढत आहेत. शिवाय आगामी काळात बाजारभावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
जर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी एकदाच कांदा बाजारात विक्रीसाठी आणू नये. कांदा बाजारात टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले जात आहे. जर बाजारात विक्रमी आवक झाली तर याचा बाजारभावावर दबाव येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी गरजेनुसार आणि टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री केली तर आगामी काळात चांगला भाव मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. सध्या बाजारात कांद्याला सरासरी 2200 ते 2300 चा भाव मिळत आहे. निश्चितच जर भावात आणखी वाढ झाली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.