Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मित्रांनो आज झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात घसरन झाली आहे. खरं पाहता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी कांद्याला कमाल बाजार भाव 4000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत मिळत होता.
मात्र आता यामध्ये तब्बल पाचशे रुपयांचे घसरण झाली असून आज झालेल्या लिलावात सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याला कमाल बाजार भाव 3500 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. दरम्यान आज राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1162 रुपये प्रतिक्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजारभाव मिळाला आहे.
मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसी मध्ये कांद्याची 4412 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रतिकूल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1700 रुपये क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसीमध्ये आज कांद्याचे 11,621 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- खेड चाकण एपीएमसी मध्ये आज कांद्याचे 2000 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावत या एपीएमसीमध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– सोलापूर एपीएमसीमध्ये आज लाल कांद्याची 21,845 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार का मिळाला असून 3500 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1300 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– नागपूर एपीएमसीमध्ये आज 1440 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- पैठण एपीएमसी मध्ये आज १२४३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 550 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढ्या कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1700 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सांगली फळे भाजीपाला मार्केट :– या एपीएमसी मध्ये आज कांद्याची 2554 कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2800 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1650 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 8280 क्विंटल एवढी लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच 1650 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव मिळाला आहे.