Kanda Bajarbhav : अहमदनगर जिल्हा कांदा उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात कांद्याची शेती केली जाते. एकंदरीत काय अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचे कांदा या नगदी पिकावर अर्थकारण अवलंबून असते.
आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक सुखद बातमी समोर येत आहे. खरं पाहता, सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा अतिशय कमी बाजार भावात विकावा लागत होता. त्यानंतर ऑक्टोबर मध्ये कांदा दरात वाढ झाली.
मात्र ऑक्टोबर मध्ये कांद्याच्या दरात चांगलीच स्थिरता होती. तदनंतर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. आता कांद्याच्या दरात रोजाना वाढ होत आहे. कांद्याला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगला दर मिळू लागला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळत आहे. काल झालेल्या लिलावात संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
अहमदनगर मध्ये कांद्याला किती मिळतोय बाजारभाव
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 777 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3500 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
याशिवाय या एपीएमसीमध्ये काल नंबर वन कांद्याची 1555 क्विंटल आवक झाली होती. या कांद्याला देखील कमाल बाजार भाव 2800, किमान बाजार भाव 2500 आणि सर्वसाधारण बाजार भाव 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- शेवगाव एपीएमसीमध्ये काल 667 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली. या एपीएमसी मध्ये नंबर एक कांद्याला 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळत असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- काल अहमदनगर एपीएमसीमध्ये 43 हजार 727 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याचे आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2650 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजारभाव मिळाला आहे.
अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये काल 1162 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 211 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2525 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2151 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये दहा हजार 39 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 100 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1300 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये काल 6,340 क्विंटल कांद्याची आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार एकवीस रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे तसेच 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.