Kanda Bajarbhav : नोव्हेंबरच्या सुरवातीला कांद्याला अतिशय विक्रमी दर मिळत होता, मात्र आता गेल्या आठवड्याभरापासून कांद्याच्या दरात मोठी घट होत आहे. दरम्यान आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज लाल कांद्याच्या दरात नागपूर एपीएमसी मध्ये मोठी वाढ झाली आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात आज लाल कांद्याला विक्रमी 2300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला असून 2100 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. साहजिकच गेल्या आठवड्याभरापासून 1500 रुपये प्रति क्विंटल वर रेंगाळलेले कांदा दर आता भडकू लागले आहेत.
निश्चितच नागपूर एपीएमसी मध्ये लाल कांदा दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत. मात्र आज दोन वाजेपर्यंत झालेल्या लिलावात फक्त नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच कांद्याला चांगला दर मिळाला आहे.
इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दर अजूनही दबावात असल्याचे चित्र आहे. दरम्यान नागपूर एपीएमसीमध्ये कांदा दरात वाढ झाली असल्याने शेतकरी बांधवांना आगामी काही दिवसात इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात सुधारणा होईल अशी आशा आहे.
खरं पाहता एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला उन्हाळी कांदा एप्रिल पासून ते सप्टेंबर पर्यंत अतिशय कवडीमोल दरात शेतकऱ्यांना विकावा लागला होता. त्यावेळी काही शेतकरी बांधवांनी भविष्यात चांगला दर मिळेल या आशेने चांगल्या प्रतवारीचा कांदा कांदाचाळीत साठवून ठेवला. शेवटी शेतकरी बांधवांच्या कांद्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठेतरी समाधानकारक बाजार भाव मिळाला.
ऑक्टोबर महिन्यात चांगला दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी हळूहळू कांदा विक्रीसाठी सुरुवात केली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जवळपास पहिला पंधरवाडा कांद्याला अतिशय विक्रमी दर मिळू लागला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याने तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर गाठला होता तर 2 हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर कांद्याला मिळत होता.
मात्र आता गेल्या एक आठवड्यापासून कांदा दरात मोठी घसरण झाले आहे. राज्यात कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला यापेक्षा कमी दर मिळत आहे.
आज देखील राज्यातील बहुतेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत आहे. नागपूर एपीएमसी मध्ये मिळालेले दर मात्र शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत आहेत.