Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरं पाहता सप्टेंबर महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत होता. मात्र आता कांदा बाजार भावात मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.
दरम्यान मध्यप्रदेश राज्यातून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मित्रांनो मध्यप्रदेश राज्य देखील कांदा उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखले जाते. सध्या मध्य प्रदेश राज्यात नवीन लाल कांद्याची आवक पाहायला मिळत आहे. रतलाम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक झाली आणि महूर्ताच्या कांद्याला तब्बल 14 हजार एक रुपये प्रतिक्विंटल एवढा बाजार भाव मिळाला. मित्रांनो रतलाम व आजूबाजूच्या परिसरात खरीप हंगामात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या या परिसरात लाल कांदा पिक काढण्याची कामे जोरात सुरू आहेत. तसेच शेतकरी बांधव लाल कांदा विक्रीसाठी देखील लगबग करत आहे.
दरम्यान रतलाम एपीएमसी मध्ये नवीन लाल कांद्याला 14 हजार एक रुपये एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. यावेळी ज्या शेतकरी बांधवांचा कांदा होता त्यांचा पुष्पहार व फेटा बांधून बाजार समिती प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी खरीप हंगामातील लाल कांदा लागवड उशिरा झाली आहे तसेच ज्या ठिकाणी लाल कांदा लागवड वेळेवर झाली त्या ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
यामुळे लाल कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात अजूनही नवीन लाल कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत नसल्याचे चित्र आहे. आपल्या राज्यात नवीन लाल कांदा जवळपास जानेवारी महिन्याच्या सुमारास बाजारात येऊ शकतो. सध्या राज्यात उन्हाळी कांद्याचे आवक होत आहे. दरम्यान शेतकरी बांधवांकडे उन्हाळी कांदा देखील कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे.
एकंदरीत खूपच कमी प्रमाणात कांदा आवक होत असल्याने कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहे. सलाम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महूर्ताच्या कांद्याला मिळालेला हा बाजार भाव देखील भविष्यात कांदा दरात तेजी राहणार असल्याचे एक इंडिकेटर असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातीलहीं बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
अहमदनगर लासलगाव सोलापूर इत्यादी प्रमुख बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात वाढ झाली आहे. शनिवारी झालेल्या लिलावात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळाला होता. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर देखील समाधान पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे राज्यात आता सरासरी बाजार भाव देखील 3000 च्या पुढे पाहायला मिळत आहे.
यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या मते, त्यांच्याकडे खूपच कमी प्रमाणात उन्हाळी कांदा शिल्लक आहे. तसेच राज्यात अजून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे उपलब्ध झाला नसल्याने त्यांना या दरवाढीचा फायदा खूपच कमी प्रमाणात मिळत आहे.