Kanda Bajarbhav : मित्रांनो सप्टेंबर महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत होता. मात्र आता कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जाणकार लोकांच्या मते बाजारात कांद्याची उपलब्धता कमी होत असल्याने कांदा दरात वाढ नमूद केली जात आहे. मित्रांनो आज अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक कमाल बाजारभाव मिळाला आहे.
आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 3600 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की आपण रोजच कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 461 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 2 हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसी मध्ये आज चार हजार 956 क्विंटल कांद्याची आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2650 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे पीएमसी मध्ये आज 13167 क्विंटल कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 382 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लीलावात या बाजारात कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव कांद्याला मिळाला असून कमाल बाजारभाव 2300 रुपये नमूद करण्यात आला. तसेच सरासरी बाजारभाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.