Kanda Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस कांदा विक्रमी दरात विक्री होत होता. दरम्यान आता कांदा दरात पुन्हा एकदा घसरण सुरू झाली आहे. आज झालेल्या लिलावात राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा निराशाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या कांदा लिलावाची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसीमध्ये आज 2837 क्विंटल कांद्याची आवक झाली. आजचा झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १४०० रुपये पर्यंत नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज कांद्याची 11,599 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1100 रुपये प्रति घेऊन तर एवढा किमान दर मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1650 रुपये नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 19681 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल तर तीन हजार रुपये नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार 1400 रुपये मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8718 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १४०० नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज नंबर एक कांद्याची 1719 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1600 रुपये नमूद करण्यात आला आहे.
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 23 हजार 315 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1500 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला अडीचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1852 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेआठशे रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याची तीन हजार क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1427 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दहा हजार 734 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1812 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज उन्हाळी कांद्याची 7777 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1200 रुपये नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 13200 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1200 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 13625 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये किमान दर मिळाला असून 2070 रुपये कमाल दर मिळाला आहे. सरासरी बाजार भाव १४५१ रुपये नमूद करण्यात आला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 13500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 501 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1300 रुपये कमाल दर मिळाला. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये नमूद करण्यात आला.