Kanda Bajarbhav : सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी सुधारणा झाली आहे. आज कांद्याला 3600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव (Onion Rate) मिळाला आहे.
कांद्याच्या सरासरी बाजारभावाने 2600 रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला आहे. मात्र असे असले तरी कांद्याच्या वाढीव दराचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे. यामुळे कांद्याचे वाढलेले बाजार भाव शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांच्या मते आता जरी कांद्याचे बाजार भाव विक्रमी वाढले असले तरी देखील शेतकरी बांधवांनी बहुतांशी कांदा हा 1500 रुपये प्रतिक्विंटल च्या दरम्यान बाजारभाव असताना विक्री केला आहे. अशा परिस्थितीत वाढीव दराचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना झाला आहे. खरं पाहता गेल्या वर्षी हवामान बदलामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला.
दरम्यान बाजारात लेट खरीप हंगामातील तसेच उन्हाळी हंगामातील कांदा सोबतच बाजारात दाखल झाला. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढली बाजार भाव कमी झाले. शिवाय त्यावेळी उत्पादित झालेला कांदा हा पावसाच्या तडाख्यात सापडला होता. साहजिकच त्या कांद्याचा दर्जा आणि टिकवणे क्षमता कमी होती. त्यावेळी काही मोजक्या शेतकऱ्यांकडे चांगली टिकवणाक्षमता असलेला कांदा उपलब्ध होता.
यामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांदा साठवून देखील फायदा झाला नाही. शेतकरी बांधवांना कांदा चाळीतला कांदा लवकर सडत असल्याने कांदा लवकरच विक्री करावा लागला. परिणामी दर वाढण्या अगोदरच शेतकऱ्यांकरचा कांदा संपला. दरम्यान आता शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात उन्हाळी कांदा शिल्लक आहे. नवीन कांदा देखील बाजारात येण्यास अजून अवकाश आहे.
शिवाय लाल कांदा लागवड आता पावसाच्या लहरीपणामुळे प्रभावित झाली आहे. यामुळे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील कांद्याचा पुरवठा कमी राहणार आहे. यामुळे आगामी काही दिवस कांद्याच्या बाजारभावात झालेली सुधारणा कायम राहणार असल्याचे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना किती फायदा होतो ही तर एक विश्लेषणात्मक बाब राहणार आहे.