Kanda Bajarbhav : आज कांदा दरवाढीला ब्रेक लागला आहे. तेजीत आलेले कांदा बाजार भाव आता घसरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा पुन्हा एकदा फोल ठरली असून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार आहे एक मुख्य नगदी पीक आहे. पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
यामुळे कांदा बाजार भावाकडे राज्यातील शेतकरी बांधवांचे बारीक लक्ष लागून असते. आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच कांदा बाजार भावाची डिटेल माहिती घेऊन येत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाविषयी चर्चा करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसी मध्ये आजच्या 4658 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कीमान बाजार भाव मिळाला असून 2200 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 11822 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1400 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1950 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज एक हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये एक हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज दहा हजार 160 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2300 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1550 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला अडीचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2062 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसीमध्ये आज 8955 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2199 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- मनमाड एपीएमसीमध्ये आज 3800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1450 रुपये नमूद करण्यात आला आहे.