Kanda Bajarbhav : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. या पिकाची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात शेती केली जाते. अशा परिस्थितीत कांदा पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
आपल्या राज्यात कांद्याची खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सध्या आपल्या राज्यात रब्बी आणि उन्हाळी हंगामातील साठवणुकीतील जुना कांदा आणि काही जिल्ह्यात नवीन लाल कांदा आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय दर मिळाला आहे याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती; या एपीएमसी मध्ये आज 300 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1200 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2 हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1600 रुपये नमूद करण्यात आला आहे.
सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सातारा एपीएमसी मध्ये आज 178 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 340 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6645 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1871 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1500 रुपये नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1600 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 17 हजार 950 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 3000 रुपये प्रति गुंठा एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 9464 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर, दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर आणि सरासरी बाजार भाव 1500 रुपये नमूद करण्यात आला आहे.
जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज १०५८७ क्विंटल चिंचवड कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 11530 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 600 रुपये किमान, 2000 रुपये कमाल आणि 1300 रुपये एवढा सरासरी दर मिळाला.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 9000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये किमान दर, 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर आणि 1100 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- कळवण एपीएमसी मध्ये आज 9300 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2210 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1250 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 12750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 2300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1451 रुपये नमूद करण्यात आला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 11500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 651 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1200 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज तीन हजार 980 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1850 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव १४०० रुपये नमूद करण्यात आला आहे.