Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसापासून रोजाना शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कांदा बाजार भावात गेल्या दोन आठवड्यापासून चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. दरम्यान आज देखील कांदा बाजारभावात वाढ झाली आहे. मित्रांनो कालच्या तुलनेत आज कांदा बाजारभावात दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.
मित्रांनो काल मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला होता. मात्र आज या एपीएमसी मध्ये कांद्याला तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. मात्र आज किमान बाजार भावात दोनशे रुपयांची घसरण झाली आहे तर सरासरी बाजार भाव काल सारखाच नमूद करण्यात आला आहे.
मित्रांनो आज मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 7,345 क्विंटल कांदा आवक झाली होती आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार मिळाला असून 3200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत कांदा दरात मोठी वाढ झाली आहे.
खरं पाहता अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कांदा चाळीत साठवलेला जुना कांदा देखील पावसाच्या लहरीपणामुळे मोठा प्रभावित झाला असून जुना कांदा आता शेतकऱ्यांकडे कमीच शिल्लक राहिला आहे कारण की पावसामुळे बहुतांशी जुना कांदा हा खराब झाला आहे. अशा परिस्थितीत काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत नवीन लाल कांदा बाजारात दाखल होत नाही तोपर्यंत कांदा दरात तेजी कायम राहणार आहे.
जाणकार लोकांच्या मते जानेवारी महिन्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात नवीन लाल कांदा बाजारात येणार आहे. अशा परिस्थितीत तोवर जुना कांदा तसेच सध्या आवक होत असलेला नवीन कांदा मोठ्या मागणीत राहणार असून याला चांगला बाजार भाव मिळणार आहे. निश्चितच दरात झालेली ही वाढ जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ञ लोकांकडून वर्तवला जात आहे.
सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1750 रुपये प्रति क्विंटल ते 2500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळत आहे. निश्चितच सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत सध्या कांदा चांगल्या दरात विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी देखील या दरवाढीचा शेतकऱ्यांना किती फायदा मिळतो हा तर येणारा काळच सांगणार आहे.