Kanda Bajarbhav : सप्टेंबर महिन्यात कवडीमोल दरात विकला जाणारा कांदा ऑक्टोबर महिन्यापासून सोन्याच्या भावात विक्री होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो खरं पाहता सप्टेंबर मध्ये कांद्याला अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत होता. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांदा पिकासाठी झालेला खर्च काढणे मुश्किल होते. आता कांद्याच्या बाजारभावात रोजाना सुधारणा होत आहे.
सप्टेंबरमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1500 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत विक्री होणारा कांदा आज तब्बल 4000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल बाजारभावात विक्री झाला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. आज कांद्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट पाहायला मिळत आहेत.
दरम्यान शेतकरी बांधवांना कांद्याला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळण्याची आशा आहे. सध्या कांद्याचे उपलब्धता पाहता बाजारपेठेत कांदाचा मोठा शॉर्टज निर्माण झाल्यास कांदा बाजार भावात अजून वाढ होण्याचे चिन्हे दिसत आहेत. दरम्यान आपण रोजच कांदा बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पिकाला मिळालेल्या बाजारभावाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसी मध्ये आज 6 हजार 38 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3500 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 9861 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 2100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3200 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2650 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– सोलापूर एपीएमसी मध्ये आज 21 हजार 76 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला सर्वाधिक कमाल बाजारभाव मिळाला आहे.
साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2405 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतेक गुंतला एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2850 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2150 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 13170 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1,200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2100 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2951 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2,200 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2930 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2100 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 9688 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 1011 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3290 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2550 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.
लासलगाव निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1250 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याला आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2451 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- पारनेर एपीएमसी मध्ये आज 8391 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2200 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 15500 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याला 901 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 3000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.