Kanda Bajarbhav : सप्टेंबर महिन्यात कवडीमोल दरात विक्री होणारा कांदा ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगलाच कडाडला आहे. कांदा दरात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मोठी वाढ नमूद केली जात आहे. कांदा दरात रोजाना वाढ होत आहे. काल देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाला आहे. काल झालेल्या लिलावात सोलापूर एपीएमसीमध्ये कांद्याची आवक मोठी वाढली होती मात्र तरी देखील कांदा बाजारभावात घसरण झालेली नाही. काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21 हजार 76 क्विंटल एवढी लाल कांद्याची आवक झाली.
काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रतिकूल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे. दरम्यान कांदा बाजार भावात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार कांद्याची सध्याची उपलब्धता आणि भविष्यात राहणारी उपलब्धता पाहता कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात कांद्याचा मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याने म्हणजेच कांद्याचे आवक कमी होणार असल्याने कांदा दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
निश्चितच येत्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांद्याच्या पिकातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या मिळत असलेला बाजार भाव देखील समाधानकारक असून शेतकरी बांधवांना यातून फायदा मिळत आहे. मात्र शेतकरी बांधवांच्या मते सध्या खूपच कमी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असल्याने या दरवाढीचा फायदा काही मोजक्याच शेतकऱ्यांना होत आहे. शिवाय लाल कांदा काढण्यासाठी अजून अवकाश असून साक्री धुळे सोलापूर अकलूज याच ठिकाणी सध्या लाल कांदा व पाहायला मिळत आहे. राज्यातील इतर भागात लाल कांदा काढण्यासाठी जानेवारी महिना उगवणार असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांकडे जुना कांदा शिल्लक आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांचा लाल कांदा काढण्यासाठी तयार झाला आहे अशा शेतकरी बांधवांना सध्या कांदा दर वाढीचा फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यामुळे होणार कांद्याच्या बाजारभावात वाढ
मित्रांनो देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान मध्ये जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला होता. शिवाय परतीच्या पावसामुळे नव्याने लागवड केलेला लाल कांदा, लाल कांदा रोपवाटिका, तसेच बराकीत साठवलेला कांदा प्रभावित झाला होता. अशा परिस्थितीत भविष्यात कांद्याची उपलब्धता खूपच कमी राहणार आहे. यामुळे कांदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लावलेले कांद्याचे पीक जास्तीच्या पावसामुळे उध्वस्त झाले होते. शिवाय यामुळे लाल कांदा पिकाला फटका बसला होता. आपल्या राज्यासह कर्नाटकामध्ये कांदा चाळीस साठवलेला कांदा यामुळे मोठ्या प्रमाणात सडला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याचे जास्तीच्या पावसामुळे 50% नुकसान झाले आहे. शिवाय आता नवीन लाल कांदा जानेवारी महिन्यात काढण्यासाठी तयार होणार आहे. यामुळे येत्या काही दिवसात मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी राहणार आहे. परिणामी कांदा बाजार भावात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
शिवाय जाणकार लोकांच्या मते नाफेड ने खरेदी केलेला जवळपास 50% कांदा हा हवामान बदलामुळे प्रभावित झाला असून खराब झाला आहे. तसेच नाफेड जवळपास 50 हजार टन कांदा गुवाहाटी दिल्ली आणि चंदीगड या राज्यात विक्री करत असते. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात नाफेडचा कांदा देखील बाजारात खूपच कमी प्रमाणात राहणार आहे. यामुळे कांदा दरात आलेली तेजी ही कायम राहणार आहे.