Kanda Bajarbhav : महाराष्ट्रातील नासिक विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग, अमरावती विभाग म्हणजे जवळपास सर्वत्र कांदा लागवड केली जाते. मात्र नासिक विभागात सर्वाधिक कांद्याची लागवड पाहायला मिळते. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते.
अहमदनगर जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने आणि सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. यामुळे अहमदनगर जिल्ह्यात बागायती पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. कांदा या नगदी पिकाची लागवड ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान आता कांदा दरात मोठी घसरण झाली आहे.
संपूर्ण राज्यात कांदा दरात घसरण झाली असली तरी देखील अहमदनगर मध्ये कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत असल्याचे चित्र आहे. म्हणून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र 1050 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला आहे.
निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही चिंतेची बाब आहे. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळाला आहे. काल झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख एपीएमसी मध्ये कांद्याला कमी दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी आणि उन्हाळी हंगामात उत्पादित केलेला कांदा कांदा चाळीत साठवून ठेवला.
कांद्याला चांगला दर मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. दिवाळीनंतर तसं झालं देखील, कांदा दरात वाढ झाली. परंतु कांदा दरात झालेली दरवाढ टिकू शकली नाही. आता बाजारात नवीन लाल कांदा आवक देखील वाढत आहे. या परिस्थितीत जुना कांदा कवडीमोल दरात विकला जात आहे मात्र नवीन कांदाही अपेक्षित अशा दरात विक्री होत नसल्याचे चित्र आहे.
यामुळे पाच महिने साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा आणि नवीन उत्पादित झालेला लाल कांदा यातून शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये कांद्याला मिळालेले बाजार भाव डिटेल मध्ये जाणून घेणार आहोत.
श्रीरामपूर एपीएमसी :- श्रीरामपूर एपीएमसी मध्ये काल 939 क्विंटल कांद्याच्या आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 250 रुपये प्रति क्विंटल किमान दर, 1650 रुपये प्रतिक्विंटल कमाल दर आणि सरासरी बाजार भाव 1050 रुपये नमूद करण्यात आला आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- संगमनेर एपीएमसीमध्ये काल लाल कांद्याची 916 क्विंटल आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2711 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1605 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये काल दहा हजार 363 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 100 रुपये प्रतिक्विंटल किमान दर, 2500 रुपये प्रति क्विंटल कमाल दर, तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव एपीएमसी मध्ये काल 2760 क्विंटल होणारी कांद्याचे आवक झाली. काल झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 1668 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1150 रुपये नमूद करण्यात आला आहे.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- काल उन्हाळी कांद्याची 110 क्विंटल आवक झाली. काल झालेले लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल किमान दर मिळाला असून 1601 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1250 रुपये नमूद करण्यात आला आहे.