Kanda Bajarbhav : शेतकरी बांधवांना गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन खर्च करावा लागतो. अनेकदा अधिकचा उत्पादन खर्च करून देखील पिकांचे नुकसान होते, त्यामुळे उत्पादनात घट होते. शिवाय बाजारपेठेत देखील शेतमालाला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी बांधव कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जातो.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बांधवांसंदर्भात देखील काहीसं असंच घडत आहे. कांद्याला सप्टेंबर महिन्यापर्यंत अतिशय कवडीमोल बाजारभाव मिळत होता. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांदा बाजार भावात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळाले. कांद्याला तब्बल 4500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळू लागला. मात्र बाजारभावात वाढ झाल्याने कांद्याच्या आवकेत देखील वाढ झाली आणि कांद्याचे बाजारभाव जवळपास आठशे रुपयांनी घसरले.
मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नोव्हेंबर रोजी कांद्याला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला. सर्वसाधारण बाजार भाव देखील 1600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला होता. या दिवशी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21 हजार आठ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. मात्र 2 नोव्हेंबर रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक लक्षणीय वाढली. 2 नोव्हेंबर रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 23 हजार 682 क्विंटल कांद्याचे आवक झाली. या दिवशी मात्र कांदा बाजार भावात घसरण झाली.
एक नोव्हेंबर रोजी कांद्याला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला, तर 2 नोव्हेंबर रोजी आवक मध्ये वाढ झाली असल्याने कांद्याला 3700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला. या दिवशी सर्वसाधारण बाजार भाव मात्र 1600 रुपये प्रति क्विंटल एवढाच राहिला. यामुळे आवक वाढली की लगेचच बाजारभाव हाणून पाडले जातात, असा आरोप कांदा उत्पादक शेतकरी बांधवांकडून केला जात आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदा बाजार भावात झालेली ही वाढ जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहणार आहे.
थोड्याफार प्रमाणात बाजारात चढ-उतार पाहायला मिळू शकतो मात्र कांदा बाजार भावात जास्तीची घसरण पाहायला मिळणार नाही. खरं पाहता सध्या बाजारात नवीन लाल कांदा आवक अतिशय नगण्य असून बाजारात नवीन लाल कांदा जवळपास जानेवारी महिन्यात दाखल होणार आहे. तूर्तास कांदा बाजारपेठेत शेतकरी बांधवांनी साठवलेला जुना कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. शिवाय शेतकऱ्यांजवळचा जुना कांदा देखील कमी प्रमाणात शिल्लक राहिला आहे.
अशा परिस्थितीत कांदा बाजार भाव कायम राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र या वाढीव दराचा मोजक्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण की बहुतांशी शेतकरी बांधवांनी आपल्या जवळचा कांदा पूर्वीच विक्री केला आहे. त्यामुळे निश्चितच कांदा बाजार भावात झालेली वाढ ही सर्वच शेतकऱ्यांना फायदेशीर नसली तरीदेखील काही शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.