Kanda Bajarbhav : कांदा दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली होती. खरं पाहता ऑक्टोबर मध्ये देखील कांदा दरात वाढ झाली.
मात्र, ऑक्टोबर मध्ये कांदा दरात किंचित अशी वाढ झाली होती. नोव्हेंबर मध्ये कांदा दरातील वाढ विशेष उल्लेखनीय होती. सप्टेंबर महिन्यात कांद्याला अतिशय कवडीमोल दर मिळत होता.
मात्र नोव्हेंबर मध्ये कांदा घरात वाढ झाली आणि कांदा पंधराशे रुपये प्रति क्विंटल ते 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सरासरी बाजारभावात विक्री होऊ लागला. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून कांदा दरात घसरण झाली असून कांदा आज 1100 रुपये प्रति क्विंटल ते 2200 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात आहे.
म्हणजेच कांदा दरात जवळपास 500 ते 600 रुपयांची घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळत असलेला बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोल्हापूर एपीएमसीमध्ये आज 5 हजार 96 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रत्येकाला एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- या एपीएमसी मध्ये आज 14,296 क्विंटल कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव 2050 नमूद करण्यात आला आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती :- औरंगाबाद एपीएमसीमध्ये आज सरासरी बाजार भावात मोठी घसरण झाली आहे. या एपीएमसी मध्ये आज 952 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1050 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज 7551 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2700 पर्यंत एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव 1750 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- येवला एपीएमसी मध्ये आज 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला दीडशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2591 रुपये प्रतिकूलता एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1300 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसूल कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एटीएमसी मध्ये कांद्याला 251 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2033 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव 1450 रुपये नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8745 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2721 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. सरासरी बाजारभाव 2201 रुपये नमूद करण्यात आला आहे.
मालेगाव मुंगसे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 2142 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1700 रुपये नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- देवळा एपीएमसी मध्ये आज कांद्याचे 5790 क्विंटल आवक नमूद करण्यात आली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज कांद्याला एक हजार 5 रुपये प्रति क्विंटन एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2305 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.