Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांदा दरात पुन्हा एकदा पडझड पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात विक्रमी दरात विक्री होणारा कांदा आता कवडीमोल दरात शेतकरी बांधवांना पिकावा लागत आहे.
परिणामी शेतकरी बांधव आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे चित्र आहे. काल झालेल्या लिलावात घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा दरात घसरण झाली आहे. या एपीएमसीमध्ये कांद्याच्या बाजारभावात तब्बल 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली आहे.
या बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात केवळ उत्कृष्ट दर्जाच्या कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. खरं पाहता गेल्या आठवड्याभरापूर्वी या एपीएमसी मध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता. यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत होते.
मात्र आता कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मोठा वांदा केला आहे. कांदा दरात तब्बल 1000 रुपयांची घसरण शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढवत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ बुधवारी आणि शनिवारी लिलाव होत असतात.
यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांचा या बाजार समितीवर अधिक मदार पाहायला मिळतो. हे दोन दिवस या एपीएमसी मध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसांपासून या एपीएमसी मध्ये पन्नास हजारापासून ते एक लाख गोण्यापर्यंतची कांदा आवक पाहायला मिळत आहे.
दरम्यान काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कमी प्रतीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून ते तेराशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटल ते 2100 रुपये प्रति क्विंटल पर्यंत चालू आहे.
तसेच पंचगंगा सीडच्या कांद्याला 2200 रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला आहे. एकंदरीत चांगल्या कांद्याचा दर देखील आता कमी झाला असल्याने शेतकरी बांधव चिंतातूर असल्याचे चित्र आहे.