Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय चिंताजनक बातमी समोर येत आहे. कांदा दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. खरं पाहता कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य नगदी पीक आहे.
त्यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून असते. एकंदरीत काय कांदा बाजारभावावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून असते.
आता कांदा दरात घसरण झाली असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भलीमोठी घट घडणार आहे. गेल्या वर्षीपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा लिलावासाठी महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय बनली आहे.
सोलापूर एपीएमसी मध्ये गेल्यावर्षी कांद्याची सर्वाधिक आवक नमूद केली जात होती. यावर्षी देखील सोलापूर एपीएमसी मध्ये कांद्याची विक्रमी आवक होत आहे. विशेष म्हणजे यावर्षी या एपीएमसीमध्ये कांद्याला चांगला बाजार भाव देखील मिळत होता. सोलापूर एपीएमसी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील नव्हे-नव्हे तर इतर जिल्ह्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणत असतात.
आता सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा दरात तब्बल 1000 रुपयांची घसरण झाली आहे. 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात सोलापूर एपीएमसीमध्ये कांद्याला तब्बल 3500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता. अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना निश्चितच दिलासा मिळाला होता मात्र एका आठवड्यानंतर सोलापूर एपीएमसी मध्ये कांदा दरात तब्बल 1000 रुपयांची घसरण झाली आहे.
नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावात सोलापूर एपीएमसी मध्ये 21,845 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली होती. तसेच त्या दिवशी झालेल्या लिलावात कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला होता, अन कमाल बाजार भाव 3500 प्रति क्विंटल नमूद करण्यात आला होता. याशिवाय सरासरी बाजार भाव 1300 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला होता.
मात्र आज झालेल्या लिलावात सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा दरात घसरण झाली आहे. आज सोलापूर एपीएमसी मध्ये 17,137 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे.
तसेच सरासरी बाजार भाव 1550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. म्हणजेच आज कांद्याच्या कमाल दरात तब्बल 1100 रुपयांची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे आज सोलापूर एपीएमसीमध्ये नऊ नोव्हेंबरच्या तुलनेत कमी आवक नमूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे.