Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचा तुघलकी निर्णय घेतला. या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये शासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाची अनेक ठिकाणी होळी केली आहे.
दरम्यान शासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर राज्यातील कांदा बाजारात काही काळ मंदी पाहायला मिळाली. राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याचे बाजार भाव उतरलेत. मात्र आता पुन्हा एकदा कांद्याचा बाजार हळूहळू का होईना पण तेजीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.
यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तीच तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील राज्यातील काही महत्त्वाच्या बाजारात कांद्याला चांगला समाधानकारक भाव मिळाला आहे.
आज राज्यातील जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार दहा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला आहे. तसेच या मार्केटमध्ये कांद्याला एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान आणि 2,400 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
राज्यातील इतर महत्वाच्या बाजारातील भाव
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2800 प्रतिक्विंटल एवढा कमाल आणि 1600 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
दौंड केडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला बाराशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2200 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला 900 रुपये किमान, 2100 रुपये कमाल आणि पंधराशे रुपये एवढा सरासरी भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज कांद्याला पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान, 2500 रुपये एवढा कमाल आणि 2175 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव मिळाला आहे.