Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात वाढ होत होती. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना सोन्याचे दिवस येणार असल्याचे सांगितले जात होते. शिवाय बाजारात आवक होत असलेला कांदा उन्हाळी हंगामातील जुना कांदा आहे आणि कांदा चाळीत साठवलेला हा जुना कांदा आता संपत चालला आहे.
तसेच नवीन लाल कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्यासाठी जानेवारीचा महिना उजळणार असल्याचे सांगितले गेले होते. मुळे कांदा दरात झालेली वाढ जानेवारी महिन्यापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज काही कृषी तज्ञांनी व्यक्त केला होता.
मात्र आता कृषी तज्ञांचा अंदाज पुन्हा एकदा फोल ठरत आहे. कारण की कांदा दरात आता घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. खरं पाहता सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत होता. त्यामुळे रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात उत्पादित केलेला कांदा शेतकऱ्यांना तब्बल पाच महिने अतिशय कमी दरात विकावा लागला.
ज्या शेतकरी बांधवांकडे कांदा साठवण्यासाठी पर्याप्त सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या शेतकरी बांधवांनी कांदा लागलीच विक्री केला. त्यांना त्यावेळी अतिशय कमी दरात कांदा विकावा लागला शिवाय ज्या शेतकरी बांधवांकडे कांदा साठवण्यासाठी बराकीची व्यवस्था होती अशा शेतकरी बांधवांनी कांदा बराकीत साठवला. शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत कांदा साठवला खरी मात्र हवामान बदलामुळे तसेच परतीच्या पावसामुळे कांदा चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला तसेच काही शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला. शेतकरी बांधवांच्या मते त्यांनी कांदा चाळीत जर पाच ट्रॅक्टर कांदा साठवला असेल तर त्यांना केवळ अडीच ट्रॅक्टर कांदा मिळाला. म्हणजेच कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यात जवळपास 50 टक्के घट झाली.
मात्र, ऑक्टोबर महिन्यात कांदा दरात वाढ झाली ऑक्टोबर महिन्यात झालेली दरवाढ नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने जाणवू लागली आणि नोव्हेंबर महिन्यात कांदा विक्रमी बाजारभावात विकला जाऊ लागला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले होते ते नुकसान भरून निघेल अशी आशा होती. मात्र आता पुन्हा एकदा कांदा दरात घसरण सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. आज झालेल्या लिलावात पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे.
अशा परिस्थितीत कांदा पिकासाठी झालेला खर्च, कांदा उत्पादनात झालेली घट आणि कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यात आलेली घट या सर्वांचा विचार केला असता कांदा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. आज पुणे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 231 क्विंटल कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल तेवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1800 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1250 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
तसेच आज झालेल्या लिलावात राज्यातील इतरही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मात्र 1700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. अशा परिस्थितीत शेती करायची कशी मोठा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. निश्चितच कांदा दरात पुन्हा एकदा घसरण होत असल्याने शेतकरी बांधव चिंतातूर आहेत.