Kanda Bajarbhav : गेल्या आठवड्याभरापासून कांदा दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. साहजिकच यामुळे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूृदंड सहन करावा लागत आहे.
गेल्या शनिवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची 7408 क्विंटल आवक झाली होती. त्या दिवशी झालेल्या लिलावात सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा कांद्याला किमान दर मिळाला तर कमाल बाजार भाव 2651 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला तसेच सरासरी बाजार भाव १८५० रुपये नमूद झाला.
मात्र आज आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ लासलगाव एपीएमसी मध्ये उन्हाळी कांद्याची 3750 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1851 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 1501 रुपये नमूद करण्यात आला आहे.
म्हणजेच एका आठवड्याच्या दराचा विचार केला असता आज लासलगाव एपीएमसी मध्ये गत हफ्त्याच्या तुलनेत कमाल बाजारभावात आठशे रुपयांची घसरण झाली आहे. तर सरासरी बाजारभावात साडेतीनशे रुपयांची घसरण झाली आहे.
म्हणजेच सरासरी बाजार भावाचा जरी विचार केला तरी शेतकरी बांधवांना एका ट्रॅक्टरमागे नऊ ते दहा हजार रुपयांचा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत सांगा आता शेती करायची कशी हा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5149 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज दोन हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 2125 रुपये नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रतिक्विंटात एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1550 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सरासरी बाजार भाव 1100 रुपये नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 3750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेळ्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला किमान बाजार भाव 700, कमाल बाजारभाव 1851 आणि सरासरी बाजार भाव 1501 रुपये नमूद करण्यात आला आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4 हजार 200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1702 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. सरासरी बाजारभाव एक हजार रुपये नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला चारशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून पंधराशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 1000 रुपये नमूद करण्यात आला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8,800 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला 535 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2300 रुपये प्रति क्विंटल असा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव सोळाशे रुपये नमूद करण्यात आला आहे.