Kanda Bajar Bhav Today : कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात तीनही हंगामात लागवड पाहायला मिळते. खरीप हंगामात, तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामात कांद्याची लागवड (Onion Farming) आपल्याकडे केली जाते.
गेल्या काही दिवसांपासून कांदा पिकाला अतिशय कवडीमोल बाजार भाव (Onion Rate) मिळत होता. मात्र आता कांदा बाजार भावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे. कांद्याला आता चारशे रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजारभाव (Onion Market Price) मिळत आहे.
निश्चितच शेतकरी बांधवांना कांद्याच्या बाजारभावात अजून सुधारणा होणे अपेक्षित आहे. दरम्यान आज नागपूर मध्ये लाल कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच कांद्याचे बाजारभाव जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजारभावाची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याची एक हजार क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज लाल कांद्याची 678 क्विंटल आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज लाल कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1800 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या बाजार समिती मध्ये आज लाल कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार 125 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज आठ हजार 426 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव कांद्याचा मिळाला असून 2 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1450 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज एक हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली. आज झालेला लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार 125 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :– येवला एपीएमसीमध्ये आज दहा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज उन्हाळी कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 320 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 650 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2345 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची आठ हजार 790 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 356 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 950 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची 3 हजार 500 क्विंटल आवक झाली आहे. या एपीएमसीमध्ये आज सांगायला दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल एवढा समाज बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची 7625 क्विंटल आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज कांद्याला 925 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.