Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Onion Grower Farmer) थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) सुधारणा झाली आहे. खरं पाहता, राज्यात अजूनही नवीन कांद्याची आवक नगण्य आहे.
तसेच बराकीत साठवलेला उन्हाळी कांदा देखील हवामान बदलामुळे खराब झाला असल्याने राज्यात कांद्याची आवक लक्षणीय कमी झाली आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) सुधारणा झाली आहे. मात्र या बाजारभावाचा रब्बी हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) कोणताच फायदा झालेला नाही.
खरं पाहता रब्बी हंगामात उत्पादित करण्यासाठी शेतकरी बांधवांना एकरी एक लाखांपर्यंतचा खर्च आला होता. शिवाय ऐन काढणीच्या वेळी निसर्गाच्या लहरीपणामुळे कांद्याच्या उत्पादनात (Onion Production) घट झाली. शिवाय हवामान बदलामुळे रब्बी हंगामात उत्पादित झालेला कांदा निकृष्ट दर्जाचा निघाला, परिणामी बराकीत ठेवलेला किंवा साठवलेला कांदा हा लवकरच सड घेऊ लागला. परिणामी रब्बी हंगामातील शेतकरी बांधवांचे 50% कांदे हे कांदा चाळीत सडले आहेत.
यामुळे आता रब्बी हंगामातील कांदा बाजारभावात वाढ होऊन देखील शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला नाही. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होण्यासाठी अजून अवकाश असल्याने अजून काही काळ कांद्याच्या बाजारभावात तेजी राहणार आहे.
मित्रानो आज झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊक आहे की आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. अशा परिस्थितीत आज देखील आपण कांदा बाजार भावाची माहिती जाणून घेऊया.
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज राहता एपीएमसीमध्ये पाच हजार 698 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 950 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे एपीएमसी मध्ये आज लोकल कांद्याची 17435 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे खडकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 39 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1250 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजार समितीमध्ये आज लोकल कांद्याची 20 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1 हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे-मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज लोकल कांद्याची 583 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून ते 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1150 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 20 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून एक हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.