Kanda Bajar Bhav : कांदा (Onion Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची लागवड (Onion Farming) आपल्या महाराष्ट्रात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात केली जाते. मात्र कांदा पीक कायमच बेभरवशाचे पिक राहिले आहे.
कधी कांदा पिकाला हवामान बदलाचा सामना करावा लागतो तर कधी बाजारात कवडीमोल दर (Onion Rate) मिळतो या अशा सुलतानी आणि अस्मानी संकटामुळे कांदा पीक आजही बेभरवशाचे बनले आहे. यामुळे यावर्षी कांदा लागवडीत घट झाली असल्याचे सांगितले जात आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी कांद्याची लागवड तुलनेने कमी झाली आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादनात (Onion Production) घट होणार आहे. एवढेच नाही तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे सत्र सुरू असल्याने कांदा रोपवाटिका आणि कांदा लागवड पूर्णपणे प्रभावित झाली आहेत. यामुळे देखील कांदा उत्पादनात घट होणार आहे. शेतमालाच्या उत्पादनात घट झाली म्हणजेच बाजारभावात वाढ होते.
अशा परिस्थितीत जाणकार लोकांनी येत्या काही दिवसात कांद्याच्या बाजारभावात (Onion Market Price) भरघोस वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मित्रांनो मराठवाड्यातील जालना जिल्हा हा कांदा लागवडीसाठी तसेच भाजीपाला उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. जालना जिल्ह्यात यावर्षी कांदा लागवड कमी प्रमाणात झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार जालना जिल्ह्यात यावर्षी कांदा बियाणे खूपच कमी प्रमाणात विक्री झाले आहे. यावर्षी कांदा लागवडीत घट झाली आहे. फक्त जालना जिल्ह्यात नाहीतर राज्यातील इतरही जिल्ह्यात कांदा बियाणे तुलनेने कमी प्रमाणात विक्री झाले आहे.
अशा परिस्थितीत इतरही जिल्ह्यात कांदा लागवडीत घट होणार आहे. यामुळे या वर्षी कांदा उत्पादनात घट आणि कांदा बाजार भाव आपली मोठी वाढ पाहायला मिळू शकते असा तज्ज्ञांचा दावा आहे. येत्या काही दिवसात नवीन कांदा बाजारात दाखल होणार आहे. मात्र आता कांदा लागवड तुलनेने कमी राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज असल्याने बाजारात नवीन कांदा आवक नगण्य राहण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीत कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊ शकते. त्यामुळे निश्चितच सर्वसामान्यांना कांद्यासाठी अधिक पैसा मोजावा लागणार आहे. दरम्यान कांदा लागवड कमी झाली असल्याने वाढीव दराचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हा एक विश्लेषणाचा भाग राहणार आहे. मात्र सर्वसामान्यांना कांदा महागात पडणार आहे एवढं नक्की. जाणकार लोकांचा कांदा लागवड कमी राहणार असल्याचा अंदाज खरा ठरला तर आगामी काही दिवसात कांदा मोठा भाऊ खाणार एवढं नक्की.