Kanda Bajar Bhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात (Onion Rate) सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आज झालेल्या लिलावात लाल कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री झाला असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Solapur Apmc) आज कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव (Onion Price) मिळाला आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1300 रुपये प्रतिक्विंटल पासून ते 2300 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव (Onion Market Price) नमूद करण्यात आला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सुधारणा झाली असली तरी देखील अजून भाववाढीची आशा त्यांना आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे, आपण रोजच कांद्याच्या बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण कांद्याच्या बाजार भावाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज कांद्याची 3753 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- आज या बाजारात कांद्याची 8146 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार पन्नास रुपये नमूद करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 13 हजार 666 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1400 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये 1611 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये कांद्याला 150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुरी एपीएमसीमध्ये आज लाल कांद्याची 1420 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये लाल कांद्याला 1900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2350 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दहा हजार 206 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या एपीएमसीमध्ये पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किंमत बाजार भाव मिळाला असून 2401 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव एपीएमसीमध्ये आज उन्हाळी कांद्याची सहा हजार क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2511 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार 150 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 18900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये कांद्याला चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2625 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज दोन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये उन्हाळी कांद्याला 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज चार हजार 111 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव एक हजार 600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 7880 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून दोन हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 1900 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.