Kanda Bajar Bhav : महाराष्ट्रात कांद्याची (Onion Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Onion Farming) केली जाते. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कांद्याची लागवड केली जाते. आपल्या राज्यात कांदा एकूण तीन हंगामात उत्पादित केला जातो. गेल्या रब्बी हंगामात (Rabi Season) देखील आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित (Onion Production) केला गेला होता.
मात्र गेल्या रब्बी हंगामात हवामान बदलामुळे कांदा पिकासाठी शेतकरी बांधवांना (Farmer) अधिक उत्पादन खर्च करावा लागला होता. शेतकऱ्यांच्या मते, रब्बी हंगामात कांदा उत्पादक करण्यासाठी एकरी पाऊन लाखांचा खर्च आला होता. एवढा खर्च करून देखील ऐन काढणीच्या वेळी रब्बी हंगामातील कांदा निसर्गाच्या लहरीपणाचा शिकारी झाला होता.
निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या रब्बी हंगामातील कांदा उत्पादन आणि उत्पादकता कमालीची कमी झाली होती. उत्पादित झालेला कांदा चांगल्या दर्जाचा नसल्यामुळे कांदा चाळीत साठवला असताना अधिकच कांद्याची घट झाली. शिवाय रब्बी हंगामातील कांदा काढणी पासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कांद्याला बाजारपेठेत अतिशय नगण्य बाजार भाव (Onion Rate) मिळाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्यांना देखील रब्बी हंगामातील कांदा पिकातून कवडीमोल उत्पन्न मिळाले आणि तसेच ज्या शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत साठवून ठेवला त्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात सडला.
आता गेल्या दीड महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात रोजाना सुधारणा होत आहे. मात्र याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होत नसल्याचे चित्र आहे. कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजारभाव मिळत आहे. जाणकार लोकांच्या मते रब्बी हंगामात उत्पादित केलेला कांदा शेतकरी बांधवांनी कांदाचाळी साठवून ठेवला आहे तो कांदा मोठ्या प्रमाणात सडला आहे.
यामुळे कांद्याची बाजारात आवक कमी झालेली आहे. म्हणजेच मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने उन्हाळ कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. सध्या कांद्याची आवक फक्त नाशिक विभागात पहायला मिळत आहे. उर्वरित राज्यात अजूनही कांद्याची आवक अपेक्षित अशी पाहायला मिळत नाही. यामुळे कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत आहे. खरे पाहाता दसऱ्यापासून नवीन लाल कांदा बाजारात येतो. मात्र यावर्षी अजूनही नवीन लाल कांद्याची आवक महाराष्ट्रात होत नसल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत कांदा बाजार भावात झालेली वाढ अजून काही दिवस कायम राहणार आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन खरीप लाल कांद्याचे अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसान झाल्याने बाजारात लाल कांद्याची आवक अतिशय नगण्य आहे. आवक होतच नाही असे नाही मात्र सध्या होणारी आवक मागणीनुसार कमी आहे. याशिवाय कांदा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या प्रतवारीत घसरण; आवकेत घट झाली आहे.
एवढेच नाही तर देशातील इतर खरीप कांदा उत्पादक राज्यात आणि महाराष्ट्रात देखील पावसामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे नवीन लाल कांदा लागवड प्रभावित झाली असून उत्पादनात घट होत आहे. तसेच काही ठिकाणी उशिरा लागवड झाली असल्याने अजून बाजारात नवीन लाल कांदा दाखल झालेला नाही. अशा परिस्थितीत बाजारात नवीन लाल कांदा आवक नगण्य आहे यामुळे सध्या जुन्या कांद्याला किंवा उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.